मुंबई

नीट यूजी-२०२४ चा निकाल जाहीर

CD

नीट यूजी-२०२४चा निकाल जाहीर
राज्यातील दोन लाखांवर विद्यार्थी पात्र, तृतीयपंथी उमेदवारांचाही समावेश
मुंबई, ता. ३ : देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या नीट यूजी-२०२४ या परीक्षेचा आज (ता. ३) निकाल जाहीर झाला. यामध्ये परीक्षेला बसलेल्या २३ लाख ३३ हजार २९७ उमेदवारांपैकी १३ लाख १६ हजार २६८ जण पात्र ठरले असून यामध्ये दहा तृतीयपंथी उमेदवारांचाही समोवश आहे.
देशभरात नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत ५ मे रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याची तात्पुरती उत्तरसूची २९ मे रोजी जाहीर केली होती. त्याचा अंतिम निकाल आज एनटीएकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये राज्यातील सुमारे दोन लाख ७५ हजार ४५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी एक लाख ४२ हजार ६६५ प्रवेशासाठी पात्र ठरले.
देशभरात नीट यूजी-२०२४ या परीक्षेला २४ लाख सहा हजार ७९ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ लाख ३३ हजार २९७ उमेदवार परीक्षेला बसले होते, तर त्यातील १३ लाख १६ हजार २६८ जण पात्र ठरले असून यात पाच लाख ४७ हजार ३७ पुरुष उमेदवार तर सात लाख ६९ हजार २२ महिला उमेदवार आहेत.
ही परीक्षा देशातील १३ भाषांमध्ये घेण्यात आली होती, त्यात मराठीतून एक हजार ७५९ उमेदवार होते. या परीक्षेत मुंबईत जोगेश्वरी येथील रहिवासी असलेल्या अमिना आरिफ आणि बेकरी कामगाराची मुलगी असून तिने या नीट यूजीमध्ये ७२० पैकी ७२० गुण मिळवले आहेत. अमिनाला पुढील शिक्षण एम्स दिल्लीमध्ये करायचे आहे; परंतु ती तिच्या शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अमिनासोबत राज्यातून वेद सुनीलकुमार शेंडे, शुभन सेनगुप्ता, उमायमा मलबारी, पलांशा अग्रवाल, कृष्णमूर्ती पंकज शिवाल आणि नेहा कुलदीप माने यांनी एआयआर-१ रँक मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाची आरती सुरू

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT