मुंबई

‘बीए एमएमसी’चा निकाल जाहीर

CD

मुंबई, ता. ५ : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए मल्टिमीडिया ॲण्ड मास कम्युनिकेशन (बीए एमएमसी) सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत १,४९० म्हणजेच ६६.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन आणि मानव्यशाखेचा निकालही ३० दिवसांच्या आत जाहीर झाला आहे.
‘बीए एमएमसी’च्या या परीक्षेसाठी दोन हजार ९९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन हजार ९०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एक हजार ४९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ७४९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. ९१ विद्यार्थी अनुपस्थित होते. सहा विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, ४५६ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने २०३ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत होती. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी विशेष लक्ष दिले. या परीक्षेत अचूकतेसाठी स्टीकर आणि ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही. विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ७८ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT