मुंबई

नीट युजीतील गोंधळावर पालक-विद्यार्थी आक्रमक

CD

‘नीट युजी’तील गोंधळावर पालक-विद्यार्थी आक्रमक
ग्रेस मार्कमध्ये घोटाळा झाल्याचा संशय; ऑडिटची मागणी
मुंबई, ता. ८ ः नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेल्या ‘नीट युजी-२०२४’ या परीक्षेच्या निकालातील गोंधळावर राज्यातील पालक आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीची प्रकरणे झाली असून असंख्य विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने ग्रेस मार्क देण्यात आल्‍याने काही विद्यार्थ्यांचे प्रचंड गुण वाढले. हा मोठा घोटाळा असून याची चौकशी करण्याची मागणी पालक-विद्यार्थी करत आहेत.
‘नीट युजी’तील गोंधळावर राज्यातील पालक-विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वैद्यकीय शिक्षण आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले. ‘नीट युजी’त ग्रेस मार्क देण्याचा मोठा घोटाळा झाला असल्याने सर्वच विद्यार्थ्यांच्या ओएमआर शीटची बाह्य संस्थेमार्फत ऑडिटची तसेच ही परीक्षाच रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
‘नीट युजी’च्या गुणवाढ घोटाळ्यात खाजगी कोचिंग क्लासेसचाही सहभाग असल्याचा दावा करत दोन दिवसांपूर्वीच देशभरातील पालक-विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता राज्यातील पालकही आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ‘नीट युजी-२०२४’ या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत करण्यात आले होते. मात्र गुजरात, ओडिशा, बिहार आदी राज्यांत या परीक्षेच्या दरम्यान अनेक प्रकारचे गैरप्रकार समोर आल्याने विद्यार्थी-पालकांनी परीक्षेच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या परीक्षेचा निकाल हा १४ जूनपर्यंत अपेक्षित होता, मात्र तो एनटीएने खूप लवकर जाहीर का केला, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. त्यासोबत या निकालात ६७ विद्यार्थ्यांना पूर्ण गुण कसे मिळाले, असा सवाल करत असा प्रकार पहिल्यांदाच झाला असल्याने सर्वकाही संशयास्पद असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.

ऑल इंडिया कोट्यातील प्रवेश अडचणीत
सुमारे ६० हजारांच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ग्रेस मार्कमुळे अधिकचे गुण मिळाले असल्याने राज्यातील असंख्य विद्यार्थी हे ऑल इंडिया कोट्यातील प्रवेशाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातील, अशी भीतीही पालकांकडून व्यक्त केली जात आहे. त्‍यामुळे ‘नीट युजी’च्या सर्व घोटाळ्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यातील आणि देशातील वैद्यकीयचे कोणतेही प्रवेश आणि त्यासाठीची प्रक्रियाही केली जाऊ नये, अशी मागणीही पालकांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT