मुंबई

अखेर मुंबईत मॉन्सून दाखल

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना असलेली पावसाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनचे रविवारी (ता. ९) मुंबईत आगमन झाल्याची अधिकृत माहिती प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिली. अंदाजापेक्षा दोन दिवसआधीच मॉन्सूनचे आगमन झाल्याने शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
केरळमध्ये यंदा ३० मे रोजी मॉन्सून दाखल झाला. तळकोकणात तो गुरुवारी (ता. ६) दाखल झाला होता. त्यानंतर साधारणत: ११ जूनपर्यंत मुंबईत मॉन्सूनसरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा शिडकावा सुरू होता; मात्र तो मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात आले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शहरात रविवारीही सकाळपासून ढग दाटून आले होते; मात्र पावसाने दिवसभर पाठ फिरवल्याचे दिसले. त्यामुळे आर्द्रतेमुळे नागरिकांना घामाच्या धारांनी चिंब होण्याची वेळ आली.
---
२४ तासांत गडगडाटासह
पावसाची शक्यता!
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत साधारणपणे ढगाळ वातावरण राहणार आहे. शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश आणि २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT