मुंबई

गड किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार

CD

गड- किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार

गड- किल्ले जतन आणि संवर्धन विषयावर लवकच २ क्रेडिटचा अभ्यासक्रम

मुंबई, ता. १० : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१ शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, विद्यार्थी विभाग आणि बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रामार्फत रायगड किल्ल्यावर रविवारी (ता. ९) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

शिवस्मारक उत्सव समिती किल्ले रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विविध संलग्नित महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थी, विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी हे या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केलेल्या किल्ले रायगड स्वच्छ मोहिमेत प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे समन्वयक सुशील शिंदे आणि सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य सहभागी झाले होते. जिल्हा परिषद रायगड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या सहकार्यातून व मुंबई विद्यापीठाचे अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत ही श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गड- किल्ल्यांची माहिती व्हावी, भव्य आणि ऐतिसहासिक किल्ले आणि वास्तूंपासून प्रेरणा मिळावी, ऐतिहासिक आणि समृद्धशाली वारसाचे जतन व संवर्धन व्हावे, किल्ले व परिसर स्वच्छ व सुंदर राहावे, अशा व्यापक दृष्टिकोनातून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाने पहिल्यांदाच राबवलेल्या या मोहिमेला विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विद्यापीठामार्फत गड- किल्ले स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, नजीकच्या काळात गड- किल्ले जतन आणि संवर्धन यावर २ क्रेडिटचा अर्थात ४५ तासांचा अनुभवाधारित अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

...
वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबई विद्यापीठामार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ७ जून रोजी विद्यापीठातर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शिवराज्याभिषेक उत्सव सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठामार्फत शस्त्रप्रदर्शन, अभिवादन रॅली आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT