मुंबई

जर्मनीसारख्या देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी (सुधारीत)

CD

जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांचा दौरा
मुंबई, ता. १० : जर्मनीसारख्या देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती गटाच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य प्रकल्प संचालक यांच्यासह सात जण राज्य कृषी, तसेच कौशल्य विकास विभागातील सचिव, आयुक्त स्तरावरील अधिकारी आणि कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंसह अनेकजण जर्मनीच्या दौऱ्यावर निघाले आहेत.

शालेय शिक्षण विभागातील शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण सचिव इ. कुंदन, प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे, ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार, सहसचिव मंगेश शिंदे, उपसचिव तुषार महाजन यांचा समावेश आहे. जर्मनीत पुरविण्यात येणाऱ्या कुशल मनुष्यबळासंदर्भातील जर्मनीतील स्टुटगार्ड येथील विविध कंपन्या, रुग्णालये, शाळा‍ आणि विविध आस्थापनांना भेटी देणार आहेत. यासोबत औद्योगिक कार्यस्थळांची या दौऱ्यात पाहणी केली जाणार आहे. हा दौरा १० ते १५ जून या कालावधीत असून यादरम्यान होणारा सर्व खर्च संबंधित विभागामार्फत केला जाणार आहे. कृषी विभागामार्फत कृषी आयुक्त रावसाहेब भागडे हे जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत. यात ते विविध कंपन्या, रुग्णालये, शाळा‍ आणि विविध आस्थापनांना भेटी देणार आहेत.
...
कौशल्य विद्यापीठाच्या उत्पन्नातून खर्च
राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या मार्फत या दौऱ्याचा खर्च केला जाणार आहे. या दौऱ्यात प्रामुख्याने कौशल्य रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभागाचे सचिव, गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर आणि विषय तज्ज्ञ व अशासकीय व्यक्तींमध्ये आनंद मापूस्कर आदींचा समावेश असून यांच्या दौऱ्याचा खर्च हा कौशल्य विद्यापीठाच्या उत्पन्नातून केला जाणार असल्याचे सोमवारी शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

Wani News : मार्कंडेय पर्वतावर पुन्हा ‘बंदी’चा डोंगर! चार वर्षांत धोकादायक शिड्या-पायवाटांची दुरुस्ती नाही, भाविकांचा संताप

SCROLL FOR NEXT