मुंबई

मुंबई विद्यापीठातील आणखी सहा महाविद्यालये झाली स्वायत्त

CD

मुंबई विद्यापीठातील आणखी सहा महाविद्यालये झाली स्वायत्त
राज्यातील विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठ सर्वात आघाडीवर
मुंबई, ता. २ : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या आणखी सहा स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने या महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान करण्यात आला. यामुळे मुंबई विद्यापीठात स्वायत्त दर्जा मिळवलेल्या महाविद्यालयांची संख्या आता अठरावर गेली आहे.
अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांना विद्यापीठ व महाविद्यालयाची एकत्रित/सह पदवी प्रदान करता येईल. या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठ आणि अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचे नावासह लोगो असणार आहे. हा दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विलेपार्ले दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये एन. एम. कॉमर्स अँड इकोनॉमिक्स कॉलेज आणि डी. जे. सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज ही दोन महाविद्यालये आहेत. यासोबत माटुंगा येथील आर. ए. पोदार महाविद्यालय, कांदिवली येथील ठाकुर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, डोंब‍िवली येथील मॉडेल कॉलेज, आणि मरिन लाईन येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क, निर्मला निकेतन, या महाविद्यालयांचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठाकडून यापूर्वी बारा स्वायत्त महाविद्यालयांना हा दर्जा देण्यात आला होता. राज्यात सर्वाधिक अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांचा दर्जा देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या झाली असून यामध्ये बहुतांश महाविद्यालये अनुदानित तत्वावर कार्यरत होती.
--
नवीन अभ्यासक्रम सुरू करता येतील
अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या मंजूरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरु करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना करणे अशा अनुषंगिक बाबींसाठी अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना स्वातंत्र्य मिळणार आहे.
--
दर्जामुळे ही मिळेल मुभा
अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांत सुरु असलेल्या अभ्यासक्रमांची पूनर्रचना करणे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नामाभिधानाप्रमाणे अभ्यासक्रमांची नावे बदलणे, मूल्यांकनाची पद्धत विहित करणे, निकाल जाहीर करणे, गुणपत्रक बहाल करणे याचीही मूभा अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयांना मिळणार आहे.
--
कोट
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशी महाविद्यालये भविष्यात पदवी बहाल करण्यासाठी मार्गक्रमण करणार आहेत. राज्यात सर्वाधिक १८ अधिकारप्रदत्त महाविद्यालये आणि ८० स्वायत्त महाविद्यालये ही मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असून शैक्षणिक स्वायत्तेकडे मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Meeting NCP Leader : अमोल मिटकरीनंतर राष्ट्रवादीतील दुसरा नेता नाराज, थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

Nanded News: एटीएम सेवा केंद्रांचा बोजवारा;कधी पैशांची वानवा, तर कधी सुविधांची कमतरता;एसी शोभेची वस्तू , तुटलेले दरवाजे, निकामी यंत्रणा

कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही जितेंद्र यांची पत्नी, 'हे' फोटो पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल

Buddha Purnima: बुद्धांचा कालामसुत्त: स्वानुभवावर आधारित विवेकाचा उपदेश; सोशल मीडियाच्या युगात कालामसुत्ताचा तरुणांसाठी मार्गदर्शन

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

SCROLL FOR NEXT