मुंबई

बेकायदा वीजजोडणी खंडित

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : अनधिकृतरीत्या वीजजोडणी घेऊन रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका, बेस्ट आणि वीज कंपनीकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने गुरुवारी दादर रेल्वे स्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरातील अनधिकृत वीजजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच फेरीवाल्यांची साधनसामुग्रीही जप्त करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. प्रशासनाने पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. या फेरीवाल्यांनी अनेक ठिकाणी व्यवसायासाठी अनधिकृतरीत्या वीजजोडणी घेतली आहे. शहर विभागात बेस्टकडून; तर उपनगरांमध्ये मे. अदाणी एनर्जी लिमिटेड या वीज कंपनीकडून वीज पुरवली जात आहे. त्यामुळे महापालिका, बेस्ट आणि वीज कंपनीच्या पथकांनी अनधिकृतरीत्या वीज जोडणीविरोधात संयुक्त कारवाई सुरू केली आहे.
-----------------------------------------------
विभागवार विशेष पथक
अनधिकृतपणे वीजचोरी करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासन बेस्ट उपक्रमाला पत्राद्वारे कळवणार आहे. तसेच अशा फेरीवाल्यांवर पोलिसांत गुन्हे नोंदवण्याबाबतही महापालिकेने सांगितले आहे; तर दुसरीकडे पालिकेनेदेखील सर्व विभाग कार्यालयांत सहायक अभियंत्यांचा समोवश असलेल्या पथकाची निर्मिती केली असून त्यांच्यामार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT