मुंबई

अंधेरीकरांचा प्रवास सुखकर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : अंधेरी पूर्व-पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर जोडल्यानंतर जुहू दिशेने अंधेरीकडे जाणारी मार्गिका गुरुवारी (ता. ४) वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे. सध्‍या या मार्गिकेवरून हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार असून अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्‍यात आली आहे.
अंधेरीतील पूर्व आणि पश्चिम विभागाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणी तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली महापालिकेने विहित मुदतीत पूर्ण केली आहे. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजूला १,३९७ मिलिमीटर आणि दुसऱ्या बाजूला ६५० मिलिमीटरवर उचलण्यात आला आहे. या जोडणीसाठी दोन महिन्‍यांपासून रात्रंदिवस काम सुरू होते. अखेर ७८ दिवसांनंतर हे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक संरचनात्मक कामे, वाहतूक व्यवस्थापनाची अनुषंगाने कामे, इतर चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. सध्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे; तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसवण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मार्गिका खुली केल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी गुरुवारी सायंकाळी प्रत्यक्ष भेट देत या पुलाची पाहणी केली.
--------------------------------------------------------------
इंधनासह वेळेची बचत
- जुहूपासून अंधेरी असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन हे मुंबई वाहतूक पोलिसांकडून केले आहे. परिणामी, वाहतूक कोंडी कमी होतानाच इंधन व वेळेच्‍या बचतीसह वायुप्रदूषण कमी होणार आहे.
- मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलद गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करताना सी. डी. बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी, या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

Pune Accident: पुण्यातील तिघांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर, पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ भीषण धडक, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

महाकुंभामध्ये व्हायरल झालेली मोनालिसा भोसलेला जीवे मारण्याच्या धमक्या; व्हिडिओ शेअर करत मदतीची विनंती

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

SCROLL FOR NEXT