मुंबई

अनुदानाचा भार सामाजिक न्याय विभागावर

CD

मुंबई, ता. ४ : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या पालख्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ३४४ पालख्यांना ६८ लाख ८० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे, मात्र अनुदानाचा आर्थिक भार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागावर टाकण्यात आला आहे. तर सांस्कृतिक, पर्यटन आदी विभागाला यातून वगळल्याने सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेकरिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय १४ जून रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत जीआर जारी करण्यात आला आहे. यामध्ये सहा मुख्य पालखी सोहळ्यांतील ३४४ पालख्यांना ६८ लाख ८० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित केले जाणार आहे. यात राज्यातील सहा मानांच्या पालख्यांमध्ये प्रामुख्याने श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताबाई नगर जिल्हा जळगाव या पालखीच्या अंतर्गत सर्वाधिक अशा ११९ दिंडींचा समोवश आहे. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यातील श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा सासवड, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा या अंतर्गत ५२ दिंडी आहेत. त्यानंतर सासवड येथील श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा या अंतर्गत ३२ दिंडींचा समावेश आहे, तर पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थान पालखी सोहळा अंतर्गत ४० आणि सर्वात कमी अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्रीक्षेत्र कौंडण्यपूर या पालखी सोहळ्यामध्ये केवळ दोन दिंड्यांचा समावेश असून एकूण ३४४ दिंड्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
---------------------
निधी तत्काळ देणार
मानाच्या पालख्यांची संख्या आणि त्या अंतर्गत येणाऱ्या दिंड्यांची संख्याही १० आहे. त्यापैकी सहा मानाच्या पालख्यांसोबतच्या ३४४ दिंड्यांची माहिती उपलब्ध झाली असून त्यांना तत्काळ हा निधी वितरित केला जाणार आहे, तर उर्वरित चार मानाच्या पालख्यांच्या अंतर्गत येणाऱ्या दिंड्यांची संख्या आणि त्यांची माहिती मिळाल्यास त्यांनाही निधी दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

Latest Marathi News Live Update : बीडमधील गेवराई शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक

पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

SCROLL FOR NEXT