मुंबई

पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयात लैंगिक छळ, रॅगिंग

CD

पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयात लैंगिक छळ, रॅगिंग
चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पुण्याच्या आयएलएस विधी महाविद्यालयात लैंगिक छळ, रॅगिंग, तसेच गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सोबतच जातीयवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे पत्रच विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिले आहे. न्यायालयाने या पत्राची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

महाविद्यालयातील लैंगिक छळ, रॅगिंग, गुंडगिरी, जातीयवाद व इतर अनेक तक्रारींबाबत कॉलेज प्रशासनाकडे दाद मागितली होती, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांना विद्यार्थ्यांनी पत्र लिहिले. या सात पानी पत्रावर ११८ आजी-माजी विद्यार्थ्यांनी अनुमोदन दिले आहे. या पत्रात महाविद्यालयातील विविध घटनांचा दाखला देण्यात आला आहे. ब्राह्मण विद्यार्थ्यांना झुकते माप दिले जाते, फुले व आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित माहितीचा कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली जात नाही, तृतीयपंथी विद्यार्थी व मुलींना त्यांच्या शरीरावरून हिणवले जाते, असे पत्रात म्हटले आहे. महाविद्यालय सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न असून या घटनांबाबत तक्रार करूनही कुलगुरूंकडून त्याची कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. शेवटचा पर्याय म्हणून मुख्य न्यायमूर्तींना विद्यार्थ्यांनी पत्र लिहिले आहे. न्यायालयाच्या निबंधकांनी याची दखल घेत राज्य सरकारला चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय
- या विविध प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी.
- विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड रद्द करण्यात यावा.
- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समान वागणूक द्यायला हवी, जातीयवादाला खतपाणी घालू नये.
- कोणत्याही प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूक होऊ नये. असे प्रकार उद्भवल्यास ते सोडवण्यासाठी प्रभावी निवारण यंत्रणा असावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT