मुंबई

गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह दुभाजकांवर नवीन रेलिंग

CD

गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह दुभाजकांवर नवीन रेलिंग
पादचाऱ्यांना क्रॉसिंगवर बंदी; अपघाताची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कोस्टल रोडच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही मरीन ड्राईव्हवर पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह येथील दुभाजकांवर नवीन रेलिंग लावण्यात आल्याने पादचाऱ्यांना क्रॉसिंगवर बंदी घालण्यात आली आहे, मात्र या मार्गावर झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनने महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस रोडच्या बाजूने तीन किलोमीटर लांबीचा मरीन ड्राईव्ह रस्‍ता आहे. इथे शनिवार, रविवारच्या दिवशी विविध भागातून आलेल्या लोकांची गर्दी असते. प्रामुख्याने पश्चिम रेल्वेने चर्नी रोड, मरीन लाइन्स किंवा चर्चगेट येथे उतरून लोक येतात.
वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह या दुभाजकांवर नवीन रेलिंग बसवण्यात आली आहे. त्‍यामुळे पादचाऱ्यांना क्रॉसिंगवर बंदी घालण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस रोडवरून प्राणसुखलाल मफतलाल जलतरण तलावाजवळून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पुढे जाऊन वळसा घालून परत यावे लागते. कोस्टल रोड तयार करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, मात्र मरीन ड्राईव्हवर पुरेसे झेब्रा क्रॉसिंग उपलब्ध करून न देता पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.
मरीन ड्राईव्हवर पुरेसे झेब्रा क्रॉसिंग नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. परिणामी अनेक पादचारी उडी मारताना किंवा मध्यभागी रेलिंग ओलांडताना दिसतात. पादचाऱ्यांची समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यासाठी पालिकेने विशेषत: शनिवार व रविवारच्या दिवशी तातडीने या भागाची पाहणी करावी, अशी आमची मागणी आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT