मुंबई

... तर २०४० पर्यंत १० टक्के मुंबई पाण्याखाली!

CD

...तर २०४० पर्यंत १० टक्के मुंबई पाण्याखाली!
समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे जमीन गमावण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः हवामान बदलामुळे समुद्राची पाणीपातळी वाढत असल्यामुळे २०४० पर्यंत मुंबईतील १० टक्क्यांहून अधिक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच, भारतातील किनारपट्टीवरील शहरांनाही समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीचा धोका असल्याचा इशारा बंगळूर येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसीच्या (सीएसटीईपी) अभ्यासात देण्यात आला होता.
हवामान बदलामुळे भारतीय किनारपट्टीवरील १५ शहरांमध्ये भूतकाळात आणि भविष्यात झालेल्या परिणामांचा ‘सीएसटीईपी’ने अभ्यास केला. त्यात चेन्नई, मुंबई, तिरुअनंतपुरम, कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, कोझिकोडे, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, थुथुकुडी आणि यानम या शहरांतील पर्यावरणीय बदलांची निरीक्षणे नोंदविण्यात आली.
---
गत ३४ वर्षांत वाढलेली पाणीपातळी (सेंटीमीटरमध्ये)
मुंबई - ४.४
हल्दिया - २.७२
विशाखापट्टणम - २.३८
कोची - २.२१
पारादीप - ०.७१
चेन्नई - ०.६७९
----
२१०० पर्यंत किती वाढेल पातळी? (सेंटीमीटरमध्ये)
मुंबई - ७६.२
पणजी - ७५.५
उडुपी - ७५.३
मंगळूर - ७५.२
कोझिकोड - ७५.१
कोची - ७४.९
तिरुअनंतपुरम - ७४.७
कन्याकुमारी - ७४.७
----
मुंबईला सर्वाधिक धोका
२१व्या शतकाअखेरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व १५ शहरांमधील समुद्रपातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यातही सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे नमूद केले आहे. २१०० पर्यंत मुंबईतील समुद्राची पाणीपातळी ७६.२ सेंमीपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई व चेन्नईच्या तुलनेत मंगळूर, हल्दिया, पारादीप, थुथुकुडी आणि यानाममध्ये जमीन बुडण्याचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे पिण्याचे पाणी, कृषी, जंगल, जैवविविधता तसेच आरोग्य क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Latest Marathi News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार अन् पिकअपची धडक

Alandi Property Tax: आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; उद्या नगरपरिषदेत दिवसभर सुनावणी

SCROLL FOR NEXT