प्रवासी करावर चर्चा व्हावी
श्रीरंग बरगे यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः राज्य शासनाने प्रवासी कराच्या रूपाने एसटीला दरवर्षी करोडो रुपयांचा चुना लावला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
बरगे म्हणाले, सन १९८७-८८ मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आले. त्यामुळे एसटी महामंडळाला उत्पन्न कर भरावा लागेल व ते पैसे केंद्र सरकारकडे जातील. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एसटीला प्रवासी उत्पन्नावर १७.५ टक्के इतका प्रवासीकर लावण्याचा निर्णय घेतला. हा कर लावताना जोपर्यंत एसटी फायद्यात आहे, तोपर्यंतच कर वसूल करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. मात्र, ही करआकारणी अद्यापही सुरू असून यावर्षी ७८० कोटी रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. ती लूट पहिल्यांदा थांबविण्यावर चर्चा झाली पाहिजे. एसटी महामंडळ हा शासनाचा अंगीकृत उपक्रम असून एसटीच्या कुठल्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलत रक्कम स्वतःला वापरलेली नाही. त्यामुळे विनाकारण सुरू असलेली अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या रकमेच्या अतिरिक्त वसुलीची चर्चा बंद करण्यात आली पाहिजे, असे बरगे यांनी म्हटले आहे.
====
लक्ष विचलित करण्यासाठी चर्चा
दीर्घकालीन संपानंतर एसटीला खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्याचे शासनाने मान्य केले होते. त्यानंतर कधीच खर्चाला कमी पडणारी रक्कम देण्यात आली नाही. फक्त सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे. त्यातूनच प्रवासी कराची रक्कम वसुली सुरू आहे, असे बरगे यांचे म्हणणे आहे.
..............
पगारवाढीची चर्चा करा
१९९२ पर्यंत महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार हे शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त होते. आता इतर सार्वजनिक उपक्रम व शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना खूप कमी वेतन मिळत आहे. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यावर चर्चा का होत नाही, असा सवालही बरगे यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.