सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. काही वैयक्तिक कारणामुळे याचिकेवर निर्णय देऊ शकत नाही, असे स्पष्ट करताना खंडपीठाने वाझेच्या याचिकेवर आदेश देण्यास असमर्थता दर्शवली.
सचिन वाझेविरोधात शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाझेने खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती; मात्र ईडीने त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी (ता. २७) खंडपीठाकडून हा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, न्या. डांगरे यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे निर्णय देऊ शकत नाही; तसेच हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी सादर करा, असे वाझे यांच्या वकिलांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.