गाला प्रिसिशन इंजिनिअरिंगच्या आयपीओसाठी
५०३ ते ५२९ रुपये किंमतपट्टा
मुंबई, ता. २७ : रेल्वे, उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती कंपन्यांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्रिंगचे उत्पादन करणारी कंपनी गाला प्रिसिशन इंजिनिअरिंगच्या आयपीओसाठी ५०३ ते ५२९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
या आयपीओमध्ये २ ते ४ सप्टेंबरदरम्यान गुंतवणूक करता येईल. यात किमान २८ शेअरसाठी व त्यापुढे २८च्या पटीतच शेअरसाठी गुंतवणूक करावी लागेल, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरीट गाला यांनी दिली. आयपीओमधून मिळालेल्या रकमेतून चेन्नईजवळ नवीन उत्पादन केंद्र सुरू करण्यात येईल. वाडा येथील उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यात येईल. यातील काही रक्कम कंपनीच्या क्षमतावाढीसाठी वापरली जाईल.
कंपनीतर्फे स्ट्रीप स्प्रिंग, स्पायरल स्प्रिंग, फासनिंग सोल्युशन्स बनवली जातात. लार्सन टूब्रो, हिताची, जॉन डियर इंडिया, शिंडलर इलेक्ट्रिक आदी त्यांचे १७५ ग्राहक आहेत. जलविद्युत प्रकल्प, पवनचक्की आदींसाठी ही उपकरणे लागतात. त्यांचा ३८ टक्के महसूल परदेशातून येतो. २५ देशांत त्यांची सामग्री निर्यात होते. यावर्षी त्यांचे एकूण उत्पन्न २,०२४ कोटी, तर निव्वळ नफा २४२ कोटी होता. त्यात मागील वर्षापेक्षा ११० टक्के वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.