मुंबई

गोविंदाच्या स्वागतासाठी पावसाची सलामी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः चार-पाच दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर होता; मात्र सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी हलक्या सरी मात्र बरसत आहेत. रात्रीपासून हलक्या सरींचे आगमन सुरूच असल्यामुळे गोविंदामध्येही उत्साह संचारला होता.
दहीहंडीच्या वेळी पाऊस येणे, ही गोविंदासाठी मोठी पर्वणीच असते. यामुळे आजच्या पावसाचा गोविंदांनीही आनंद घेतला. पावसाच्या सरी अंगावर झेलत त्यांनी थर लावले. मोठ्या सरींचा सामना करत आत्मविश्वासाने दहीहंडी फोडत पावसाचा मान ठेवला. पावसामुळे अनेक मैदानांमध्ये चिखल झाला होता. या चिखलामध्ये गोविंदा मोठ्या आनंदाने थिरकले. मंगळवारपासूनच कुलाबा, भायखळा, दादर, सायन, माटुंगा, चेंबूर, घाटकोपर, मालाड, बोरिवली, पवई आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यामुळे संपूर्ण मुंबईतील पावसाळी वातावरण गोविदांना हवेहवेसे वाटत होते.
---------------------------------
मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. काही वेळा ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश असून मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
...................................
पावसाची नोंद
गेल्या २४ तासांच पावसाने ही चांगली हजेरी लावली. कुलाबा १३.४५, वांद्रे १०.६७, बोरिवली १२.६८, भायखळा १२.४५, चेंबूर ९.९, दादर ४.८, माटुंगा १२.९४, गोरेगाव १०.१४, सायन १६.२ मिमी पावसाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT