मुंबई

देशभरातील सायबर गुन्ह्यात सहभागी आरोपीस अटक

CD

देशभरातील सायबर गुन्ह्यांत सहभागी आरोपीस अटक

मुंबई, ता. २८ : फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे देशभरात अनेकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीतील एकाला दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ माहेश्वरी (वय ५०) असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्याबाबत देशभरातून ४१ तक्रारी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर नोंद होत्या. पेडर रोड परिसरात राहणाऱ्या दोन बहिणींची अलीकडेच फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपद्वारे ३१ लाख रुपयांना फसवणूक झाली होती. त्यांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले; त्याआधारे सायबर पोलिस ठाण्याचा (दक्षिण विभाग) तपास सुरू होता. त्यातील एक खाते सिद्धार्थ याचे होते. त्याचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिस पथकाला यश आले. चार ठिकाणी पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे देशभरात घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकेल, असा विश्वास पोलिस पथकाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT