मुंबई

तीन शिक्षकांकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्षभर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन शिक्षकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सख्खे भाऊ असून पीडित विद्यार्थिनी त्यांच्याकडे शिकवणीला जात होती. शिकवणीतील अन्य विद्यार्थिनी आणि पालकांकडेही पोलिस चौकशी करत आहेत.
विद्यार्थिनीची आई आणि मध्य मुंबईतील बालविकास केंद्रातील समुपदेशकाच्या प्रसंगावधानाने या गुन्ह्यास वाचा फुटली. दक्षिण मुंबईत आरोपींनी सुरू केलेल्या खासगी शिकवणीत आणि निवासस्थानी या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. या शिकवणीत सातवी ते बारावी इयत्तेचे वर्ग भरत होते. या शिकवणीला सुमारे ४० विद्यार्थिनी येत होत्या.
कौटुंबिक कलहातून या विद्यार्थिनीचे आई-वडील विभक्त झाले होते. त्यामुळे या विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. आरोपींपैकी एकाने तिला आधार देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याच्या दोन भावांनीही तिचा गैरफायदा घेतला. समुपदेशनानंतर हा प्रकार उघड झाला. तिची आई बदनामीच्या भीतीने तक्रार करण्यास राजी नव्‍हती. अखेर समुपदेशकांनीच तक्रार दिली. त्याआधारे पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली, तर तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी रविवारी विमानतळावरून अटक करण्यात आली. तो पालकांसोबत राज्याबाहेर सहलीसाठी गेला होता.
----
समुपदेशकांमुळे फुटली वाचा
वडिलांपासून दूर झाल्यामुळे ती अबोल आणि अलिप्त राहत असावी, असा तिच्या आईचा समज झाला; मात्र तिच्या वर्तनात बरेच दिवस उलटल्यानंतरही बदल होत नसल्याने तिच्या आईला काळजी वाटू लागली. त्यासाठी तिने मध्य मुंबईतील बालविकास केंद्रातील समुपदेशकांची मदत घेतली. समुपदेशानंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT