मुंबई

ठाणे, तामिळनाडूत गुन्हा करून पळालेल्या आरोपींना मुंबईत अटक

CD

ठाणे, तमिळनाडूत गुन्हा करून
पळालेल्या आरोपींना मुंबईत अटक
मुंबई, ता. ३ : ठाणे आणि तमिळनाडू राज्यात गुन्हे करून पळून मुंबईत आलेल्या दोन आरोपींना अनुक्रमे माहीम पोलिस, गुन्हे शाखेने अटक केली. मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे माहीम पोलिसांनी २९ सप्टेंबरला सापळा रचून असिफ शेख ऊर्फ बबलू यास देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली.
चौकशीदरम्यान शीळ डायघर परिसरात झालेल्या गोळीबारात असिफचा सहभाग स्पष्ट झाला. मित्रांसोबत हे पिस्तूल हाताळताना चुकून सुटलेल्या गोळीने असिफचा मित्र जखमी झाला होता. आसिफविरोधात विविध प्रकारचे २४ गुन्हे नोंद असल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली.
अन्य घटनेत गुन्हे शाखेने तामिळनाडू राज्यातील वेल्लुरमध्ये हत्या करून पळालेल्या चिन्न सुब्बाराव अयनार(२४) या सराईत गुन्हेगारास अटक केली. अयनार तामिळनाडूतील मंगलम, वेल्लुर पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून एका हत्या प्रकरणात तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. मुंबईतील तेल शुद्धीकरण प्रकल्पात तो टँकरचालक म्हणून काम करत होता. आठ तास पाळत ठेवत पथकाने त्याला चेंबूरच्या वाशी नाका परिसरातून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: उच्चांकावरून सोनं 30 हजारांनी स्वस्त! मे महिन्यात मोठी घसरण; आजचा 1 तोळा भाव किती?

Tuljapur Robbery Case : काळजाचा थरकाप! भाड्याच्या बहाण्याने बोलावले अन् 4 तास केली अमानुष मारहाण; पंढरपूरच्या चालकाला तुळजापुरात लुटले

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 11.35 कोटींची कमाई

Mumbai Goa highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावर महाकोंडी, कोकणात येणाऱ्यांची गैरसोय; रत्नागिरी, संगमेश्वर येथे वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT