मुंबई

आई तुळजाभवानीचा देखावा भक्तांचे आकर्षण

CD

आई तुळजाभवानीचा देखावा भक्तांचे आकर्षण
सात रस्ता माउलीचा सामाजिक उपक्रमाचा वारसा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : नवरात्रोत्सवात आकर्षक सजावट, देखावे भक्तांचे आकर्षण ठरते. सात रस्ता माउलीकडून यंदा आई तुळजाभवानी मातेचा देखावा साकारण्यात आला आहे. राज्यभरातील भक्तांसह मराठी सिनेकलाकार देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी आवर्जून येतात.
सात रस्ता माउली यंदा ६२ व्या वर्षांत पदार्पण करत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याचे सात रस्ता माउलीचे सचिव आशीष नरे यांनी सांगितले. उंच मनमोहक आकर्षक देवीच्या मूर्ती, मंडपातील सजावट, देखावे पहाण्यासाठी भक्तांचे पाय आपसूकच मुंबईत वळतात. मुंबईत सहा ते सात हजार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक मंडळ आपल्या परीने मंडपाची सजावट देखावे करतात.
कलादिग्दर्शक देवेंद्र रेडिज यांनी यंदा आई तुळजाभवानी मातेचा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे सात रस्ता माउली व्यवस्थापनाकडे देवीची मूर्ती साकारण्यासाठी स्वतःचा साचा आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नऊ दिवस नऊ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सात रस्ता माउलीकडून विशेष काळजी घेतली जाते.
साक्षात देवी आपल्‍यासमोर बसली आहे, अशी अनुभूती सात रस्‍ता येथील माउलीला पाहून आल्‍याशिवाय राहत नाही. मूर्तिकार विशाल शिंदे, अमय कांदळगावकर यांनी ही मूर्ती साकारली आहे.

साजश्रृंगार पाहण्याठी भक्तांची गर्दी!
देवीच्या मूर्तीत जिवंतपणा असून देवीचा साजश्रृंगार पाहण्यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक आदी भागातील भक्त नवरात्रोत्सवात सात रस्ता माउली देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

पूरग्रस्‍तांना मदतीचा हात
कोल्हापूर, महाड येथे पूर आला होता. त्यानंतर तेथील नागरिकांना आधार देण्यासाठी सात रस्ता माउलीने सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला. जीवनावश्यक वस्तूंचा एक ट्रक पाठवण्यात आला होता. कोरोना काळात लोकांना वैद्यकीय उपचार, मदत मिळावी यासाठी सात रस्ता माउलीने मुख्यमंत्री फंडात ५० हजारांची मदत केली होती. वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.

कोळी महिलांना विशेष मान
दरवर्षी नवरात्रोत्सवातील एक दिवस मुंबईतील कोळी महिला देवीची ओटी भरण्यासाठी येतात. या दिवशी आई एकवीरा देवीचे रूप देण्यात येते. यंदा शुक्रवारी मुंबईतील कोळी बांधव देवीची ओटी भरण्यासाठी येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT