मुंबई

वादग्रस्त अधिकाऱ्यावर अपर परिवहन आयुक्त पदाचा भार ?

CD

भरत कळसकरांकडे आयुक्तपदाचा भार
भाराला परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता ३ : उच्च न्यायालयात खटला, एसीबी चौकशी आणि गुन्हा दाखल असल्यास पदोन्नती किंवा अतिरिक्त कार्यभार देता येत नाही. मात्र, ताडदेवचे आरटीओ आणि रस्ता सुरक्षा उपायुक्त भरत कळसकर यांच्याकडे गुरुवार (ता. २) अपर परिवहन आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. मात्र, वादग्रस्त अधिकाऱ्यावर अपर परिवहन आयुक्तपदाचा भार देण्यात आला, असा आरोप मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. पाटील यांनी पत्रात कळसकर यांच्यावर सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त अपर परिवहन आयुक्तपदाच्या कार्यभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
कळसकर यांच्याकडे ताडदेवचे आरटीओ आणि रस्ता सुरक्षा उपायुक्त पदाचा कार्यभार आहे. परंतु आता त्यांच्याकडे अपर परिवहन आयुक्त पदाचा तिसरा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आहे. तसेच सहपरिवहन आयुक्त रस्ता सुरक्षाचाही कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याशिवाय इतर अधिकारी सक्षम नाहीत का? असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

कोट
मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तीन वर्षांपूर्वी आरोप करण्यात आले होते. त्याची आयुक्त स्तरावरच्या अधिकाऱ्याने चौकशी करण्यात आली आहे, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. हे आरोप खोडसाळपणाचे आहेत.
-भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त, (अतिरिक्त कार्यभार )

कोट
आमच्या रेकॉर्डवर कोणतीही चौकशी प्रलंबित नाही. अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय नियमित शासकीय कामकाजाप्रमाणे घेतला आहे.
-विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT