समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका!
न्यायालयाकडून गंभीर दखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईच्या समुद्रात तरंगणारा कचरा हा प्रचंड घातक आहे. या प्लॅस्टिकमुळे सागरी जीवांनाच नाही तर माणसांच्या जीवालासुद्धा धोका आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आज समुद्रात तरंगणाऱ्या प्लॅस्टिकची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने सुओमोटो याचिका दाखल करून घेत केंद्र, तसेच राज्य सरकारला याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनने (सीआयएफई) केलेल्या अभ्यासानुसार, समुद्रातील माशांच्या आतड्यात मायक्रोप्लॅस्टिक आढळले. या अहवालाबाबतचे वृत्त छापून आल्यावर त्याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने आज (ता. ४) घेतली. याप्रकरणी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने सुओमोटो याचिका दाखल करून घेत महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना, तसेच केंद्र सरकारला याची गंभीर दखल घेण्यास सांगितले. न्यायालय म्हणाले की, समुद्रात अचानक पूर आल्यास या कचऱ्यामुळे पुराचे पाणी ओसरण्यास अधिक वेळ लागेल. त्यामुळे मुंबईतील रहिवाशांचे मोठे नुकसान होऊ शकते. नरिमन पॉइंटसारख्या भागावरही त्याचा परिणाम होईल. न्यायमूर्ती म्हणाले की, अहवालानुसार पॅसिफिक महासागरात ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच नावाचे एक क्षेत्र आहे, जे आकारमानात फ्रान्सच्या तिप्पट आहे. विशेष म्हणजे संपूर्णपणे मायक्रोप्लॅस्टिकने बनलेले असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा मिसळला आहे. हे अतिशय भयावह आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.