मुंबई

''सर्वकर्या'' च्या एकाच अॅपवर आणल्या अंसख्य सेवा

CD

‘सर्वकर्या’च्या एकाच ॲपवर आणल्या असंख्य सेवा
एसएनडीटी विद्यापीठातील दोन नवदुर्गांनी विकसित केले डिझाइन

मुंबई, ता. ५ : नागरिकांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्या केवळ एकाच ॲपवर उपलब्ध करून देण्याची किमया एसएनडीटी विद्यापीठातील उषा मित्तल इंजिनिअरिंग कॉलेजच्या इनोवरी सेंटरमधील अंतिम वर्षांच्या स्नेहा झा आणि अदिती मंडोले या विद्यार्थिनींनी केली आहे.
आजच्या डिजिटल युगात विविध प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी असंख्य ॲप आणि संकेतस्थळांचा मारा सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहकांवर केला जातो. त्यात नेमक्या गरजांपेक्षा असंख्य वेळा इतर पर्यायही समोर आणून त्यासाठीचा गोंधळ निर्माण होतो आणि ग्राहक नको त्या ॲप आणि संकेतस्थळावर जाऊन आपला वेळ वाया घालवतात.
या दोघींनी ‘सर्वकर्या’ नावाचे ॲप डिझाइन केले असून त्यातून शेकडो नागरिकांना एकाच ॲपवर असंख्य अशा आपल्या गरजेच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी मद‍त मिळत आहे. त्‍यामुळे येत्या काळात ‘सर्वकर्या’चे सेवा क्षेत्र अधिक विकसित करण्यासाठी याचा लवकरच स्टार्टअपमध्ये समावेश केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. यात ग्रामीण भागावर मुख्यतः लक्ष केंद्रित केले जात आहे. त्‍यामुळे आवश्‍यक सेवांची कमतरता असलेल्‍या ग्रामीण भागात हे ॲप प्रभावी ठरत आहे.
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा, शिक्षण, शेतीविषयक तंत्रज्ञान, स्वच्छता आणि इतर कौशल्याधारित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ॲपची मोठी मदत मिळत आहे.
हा प्रकल्प ‘इनोवारी’अंतर्गत उषा मितल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि डाटाबाइट सर्व्हिसेस ॲण्ड सिस्टिम्स यांच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग असून, विश्राम बापट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे.
‘सर्वकर्या’ स्थानिक अर्थव्यवस्थेला आधार देत असून, विशेषतः ग्रामीण भागातील सेवा पुरवणाऱ्यांना योग्य व्यासपीठ म्हणून एक वेगळी ओळखही बनली आहे.

वेगळी वैशिष्ट्ये
- ‘सर्वकर्या’मध्ये प्रामुख्याने वेळेचा आणि श्रमांचा होणारा अपव्यय मोठ्या प्रमाणात टाळता येतो.
- ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध.
- ग्राहकांचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि सुविधाजनक बनतो. हे ॲप सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी एक आवाज शोध इंजिन उपलब्ध आहे, जे ग्राहकांना त्यांच्या गरजा सोप्या भाषेत सांगण्याची परवानगी देते.
- ग्राहकांना हवी असलेली सेवा किंवा माहिती मिळविण्यात अधिक सुलभता मिळते.
- ग्राहकांच्या शंकांना त्वरित उत्तर देण्यासाठी एक चॅटबॉटदेखील आहे, जो २४/७ उपलब्ध असतो.
- ‘सर्वकर्या’ ॲपचा प्लॅटफॉर्म देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT