मुंबई

आदित्य बिर्ला समूह दागिने व्यवसायात

CD

आदित्य बिर्ला समूहाचा
दागिने व्यवसायात प्रवेश

मुंबई, ता. ५ : आदित्य बिर्ला समूहाने दागिने व्यवसायात प्रवेश केला असून त्यांच्या इंद्रिय ब्रँडच्या दुकानाचे आज बोरिवलीत उद्घाटन करण्यात आले.
आदित्य बिर्लाने दिल्लीत तीन, तसेच अहमदाबाद, पुणे आणि जयपूर येथे प्रत्येकी एक दुकान उघडले आहे. मार्चच्या आधी घाटकोपर व पिंपरी येथेही दुकाने उघडली जातील आणि मार्चपर्यंत देशात एकूण २५ दुकाने उघडली जातील, अशी माहिती इंद्रिय ब्रँडचे संचालक दिलीप गौर यांनी दिली. येत्या चार वर्षांत भारतात ४०० स्टोअर उघडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये गुंतवले जातील, असेही गौर म्हणाले.
ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही ऑनलाइन पद्धतीने दागिने पाहणे, अगदी स्वतःच्या अंगावर घालून आपण कसे दिसतो, याचे प्रात्यक्षिक दाखवणे हे सगळे करू. तिथे ग्राहक सगळे दागिने शोधू शकतील; मात्र ऑनलाइन विक्री होणार नाही, फक्त निवडीचे आणि पाहण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल, असेही गौर यांनी सांगितले. आमच्या दुकानांमध्ये देशातील परंपरागत कलाकुसरीचे दागिने नव्या स्वरूपात दिले जातील. त्यासाठी सोळा हजार डिझाइन तयार केल्याचेही ते म्हणाले. सध्या देशातील तयार दागिन्यांची बाजारपेठ आठ लाख कोटी रुपयांची आहे. त्यातले ६५ टक्के दुकानेही नॉन ब्रँडेड आहेत. हळूहळू ब्रँडेड दुकाने वाढत जातील, असेही गौर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT