मुंबई

सहा महिन्यांत ४० किलो वजन केले कमी

CD

सहा महिन्यांत ४० किलो वजन केले कमी
४२ वर्षीय महिलेवर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : अस्थमा, स्लीप ॲप्निया आणि मधुमेहाने त्रस्त असलेल्या एका ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेनंतर महिलेने अवघ्या सहा महिन्यांत ४० किलो वजन कमी केले आहे.
नफिसा खान (नाव बदलले आहे) ही तिच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत होती. नफिसाला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. वयाच्या ३८व्या वर्षी तिला हृदयविकाराचे निदान झाले. वजन वाढल्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. १२५ किलोपेक्षा जास्त वजन झाल्‍यानंतर तिची झोप उडाली. श्वास घेण्यासाठी तिला रात्रभर जागे रहावे लागत असे.
डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले की, नफिसा आमच्याकडे आली तेव्हा तिचे वजन १३० किलो होते. इतर अनेक आरोग्य समस्यांनी ग्रासले होते. चार वर्षांपूर्वी तिला किडनीशी संबंधित त्रासही झाला. तिच्यावर उपचार झाले नसते, तर भविष्यात तिला आणखी गुंतागुंतीचा सामना करावा लागला असता.
न्यूट्रिशनिस्ट शमिका गिरकर यांनी सांगितले की, महिलेला सुमारे तीन आठवडे लो-कॅलरी, उच्च-प्रथिनेयुक्त आहार देण्यात आला. त्‍यामुळे नफिसाला शस्त्रक्रियेपूर्वी सहा ते आठ किलो वजन कमी करण्यास मदत झाली. आहारातील बदलामुळे तिच्या यकृताचा आकार कमी झाला. नफिसावर गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यामध्ये पोटाचा एक लहान पाउच तयार करण्यात आला आणि या थैलीशी जोडण्यासाठी लहान आतडे पुन्हा जोडण्यात आले. पोटाचा उरलेला भाग आणि आतड्याचा पहिला भाग बायपास केला गेला. परिणामी हार्मोनल बदलामुळे भूक मंदावली, पोट भरल्याची भावना वाढली आणि अन्न सेवनावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
गॅस्ट्रिक बायपास सर्जरी ही पोटात लहान छिद्र पाडून केली जाते. ही शस्त्रक्रिया, सामान्य भूल देऊन केली जाते, या प्रक्रियेला जवळपास ६० ते १२० मिनिटे लागतात. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर चार ते सहा तासांच्या आत पुन्हा चालण्यास सुरुवात करण्यास प्रोत्साहित केले जाते. ३६ ते ४८ तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडले जाते.

लठ्ठपणा असलेल्‍या रुग्‍णांना दिलासा
बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेमुळे शरीराचे एकूण वजन अंदाजे ३० ते ४० टक्‍के कमी होते. गंभीर लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना वजन कमी करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या ही पद्धत सर्वात प्रभावी मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT