मुंबई

४६ हजार प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन

CD

मुंबई, ता. ९ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोंदणीकृत ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना डीबीटीद्वारे आज पहिल्या हप्त्याचे ४२ कोटींचे विद्यावेतन देण्यात आले. या माध्यमातून राज्यातील युवकांना उद्योजकांकडे ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ देऊन रोजगारक्षम करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तीन लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे. एक लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून १०,५८६ आस्थापनांनी याकरिता नोंदणी केली आहे. या योजनेकरिता राज्य सरकारकडून ५,५०० कोटी निधी मंजूर आहे. यावेळी आचारसंहितेपूर्वी कौशल्य विकास विभागाची सगळी कामे पूर्ण करून निकालासाठी असलेल्या सर्व प्रलंबित फायलींचा निपटारा केला जाईल, असेही लोढा यांनी सांगितले. तसेच, राज्यातील सर्व आयटीआयप्रमाणेच मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संविधान मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी केली.
---------------------------------------------
२७१ आयटीआयचे नामकरण
देश व समाजासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे २७१ शासकीय औद्योगिक संस्थांना (आयटीआय) देण्यात येतील. त्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या जातील, असेही लोढा म्हणाले. यापूर्वी याच पद्धतीने १४६ आयटीआयचे नामकरण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT