मुंबई

वैद्यकीय शिक्षण मराठीतून मिळणार

CD

वैद्यकीय शिक्षण मराठीतून मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महाराष्ट्रात आता मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेता येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते; मात्र आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याचा निर्णय झाला आहे. यातून मराठी मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
मुंबईतील जीटी रुग्णालयात सुरू होणाऱ्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासह राज्यातील विविध महाविद्यालयांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे पंतप्रधानांनी संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान म्हणाले, ‘या १० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारदरा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी आरोग्य सेवेची केंद्रे बनतील. महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा वाढल्या आहेत आणि राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे ६,००० होणार आहे. वैद्यकीय शिक्षणात शिथिलता आणली असून राज्यातील तरुणांसाठी नवीन महाविद्यालयांची दारे खुली करून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, यासाठी शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे.’ वैद्यकीय शिक्षणाच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते, आता महाराष्ट्रातील तरुणांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनी, वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT