मुंबई

आश्रमशाळेतील मुलांची जबाबदारी कोणाची?

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्यभरातील आश्रमशाळांच्या दयनीय अवस्थेप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याप्रकरणी मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्यभरातील आश्रमशाळेत आतापर्यंत झालेल्या ८० मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल राज्य सरकारला केला आहे.
राज्यभरातील आश्रमशाळांची बिकट अवस्था आहे. मुलींना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने  रवींद्र  तळपे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी (ता. ९)  मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी आश्रमशाळांच्या परिस्थितीबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही कधी अशा संस्थांना भेट दिली आहे, कृपया अशाच संस्थेत जाऊन मुलांची दुर्दशा पाहा. कुठल्यातरी आश्रमात जाऊन तुम्हाला परिस्थितीची जाणीव होईल, असे खंडपीठ म्हणाले. तसेच आश्रमशाळांसाठीच्या विविध योजना कागदावर असल्याने सरकारने याप्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

Latest Marathi Live Update : संभाजीनगर घाटी रुग्णालयाचं गॅस सिलेंडरसाठी जिल्हा प्रशासनाला पत्र

LPG Gas Shortage: वडापाव चाळिशीपार, चहा तिशीला! चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थिती; भजी खाणेही आवाक्याबाहेर

SCROLL FOR NEXT