मुंबई

बेकायदा बांधकामांवरून पोलिसांची परेड

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मालाडच्या मढ गावात मालकी हक्काच्या जमिनीत बेकायदा बांधकामाविरोधात चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल आहे; मात्र या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याचा असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. तसेच, अतिरिक्त पोलिस आयुक्तांना पुढील सुनावणीवेळी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मढच्या एरंगळ येथील वैभव ठाकूर यांच्या जागेत बेकायदा बांधकाम करण्यात आले. २०१६ साली ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने याप्रकरणी एसआयटी स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. सुमित शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी (ता. १७) सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी दत्तात्रय धोपटे न्यायालयात अनुपस्थित असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. चार वर्षांपूर्वी गुन्हा नोंद करून कोणताही कारवाई झाली नसल्याने कोणाच्या तरी दबावाखाली पोलिस  तपास असल्याचा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. तसेच, या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे वर्ग करण्याची तंबी देताना सुनावणी तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Action Pune : भेसळखोरांचे धाबे दणाणले! अन्न नमुन्यांचे अहवाल आता १४ दिवसांत येणार; जिममधील 'प्रोटीन पावडर' विक्रीवरही तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

मोठी बातमी! जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी, बेलापूर न्यायालयात खळबळ

India A vs UAE: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये उद्या भारतासमोर यूएईचं आव्हान! सेमीफायनलचं तिकीट पणाला, वैभवच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये पोलीस कोठडीत २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या? अटकेच्या दुसऱ्याच दिवशी उचलले टोकाचे पाऊल

COP31 Climate Summit Collapse Turkey : तुर्कीयेमधील संयुक्त राष्ट्रांची 'कॉप ३१' हवामान परिषद फिस्कटली! जीवाश्म इंधनांच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद, मुख्य कराराविनाच चर्चा संपली

SCROLL FOR NEXT