गरिबांच्या घरांसाठी वडिलांचा बळी
एसआरए संघर्षावर झिशान सिद्दीकींची एक्सद्वारे प्रतिक्रिया
मुंबई, ता. १७ ः माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच झिशान सिद्दीकी यांनी झोपू प्रकल्पातील संघर्षाकडे लक्ष वेधले.
निष्पाप गोर-गरिबांचा जीव आणि घरे वाचवताना, त्यांना सुरक्षित ठेवताना माझ्या वडिलांनी जीव गमावल्याची प्रतिक्रिया देताना त्यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही, असा संदेश गुरुवारी संध्याकाळी एक्सद्वारे झिशान यांनी दिला आहे. तसेच, या धक्क्यातून अजूनही कुटुंब सावरले नसल्याचे नमूद केले.
निर्मल नगर येथील झिशान यांच्या कार्यालयातून बाहेर पडताच सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वस्तीवरील झोपू प्रकल्पातून उद्भवलेला संघर्ष सिद्दीकी यांच्या हत्येच्या मुळाशी असावा, अशी चर्चा सुरू झाली. गुन्हे शाखेनेही हत्येमागे हा संघर्ष असल्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. दरम्यान, गुरुवारी झिशान यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. बुधवारी त्यांनी सहपोलिस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांची भेट घेतली होती.
-------------------------------------------------
सर्वेक्षणाला विरोध
निर्मल नगर वस्तीत एसआरएकडून सुरू असलेले सर्वेक्षण झिशान यांनी उधळून लावले होते. ज्या रहिवाशांची संमती नसेल तेथे सर्वेक्षण करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल याप्रकरणी गुन्हाही नोंदवला गेला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.