मुंबई

बालसुधारगृहात आरोपीवर लैंगिक अत्याचार?

CD

बालसुधारगृहात आरोपीवर लैंगिक अत्याचार?
तक्रारीबाबत पोलिस साशंक

मुंबई, ता. २२ : डोंगरी येथील बालसुधारगृहात एका अल्पवयीन आरोपीने आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली. कोठडीतील अन्य अल्पवयीन आरोपीने हे अत्याचार केल्याचा आरोप त्याने केला. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी सोमवारी पोक्सोनुसार गुन्हा नोंदवला असला तरी तक्रारदाराने सुधारगृहातून सुटकेसाठी बनाव रचल्याचा संशय आहे.
तक्रारदार अल्पवयीन आरोपीस गेल्याच आठवड्यात सहार पोलिसांनी विमानांमध्ये बॉम्बची अफवा पसरवल्याबद्दल अटक केली होती. अकरावीत शिकणारा आरोपी मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे. व्यावसायिक वादातून भागीदार मित्राला अडकविण्याच्या हेतूने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यूयॉर्कसाठी उड्डाण घेतलेल्या विमानासह अन्य दोन विमानांमध्ये सहा किलो आरडीएक्ससह सहा अतिरेकी उपस्थित असल्याची माहिती एक्स हॅण्डलवरून सर्वदूर पसरवली. त्यांनतर उड्डाण घेतलेले विमान दिल्ली तळावर तातडीने उतरविण्यात आले. झाडाझडती घेतल्यावर ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. उर्वरित दोन विमानांची उड्डाणे झाडाझडती पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यात आली. याप्रकरणी सहार पोलिसांनी तांत्रिक तपास करत या अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेत बाल न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या आरोपीला बालसुधारगृहात पाठवले. या आरोपीच्या तक्रारीनुसार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी शौचालयात गेला असताना अन्य अल्पवयीन आरोपीने तोंडात तांबड्या रंगाच्या गोळ्या आणि शुभ्र रंगाची भुकटी कोंबत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.
...
याआधीही दोन खोट्या तक्रारी
या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी लागलीच गुन्हा नोंदवला. तक्रारदार तरुणाची वैद्यकीय चाचणी करून घेण्यात आली. तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने याआधी अशा प्रकारच्या दोन खोट्या तक्रारी छत्तीसगड येथे केल्या होत्या. तसेच सहार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातही कट आखत मित्रावर आळ येईल, अशा पद्धतीने देखावा उभा केला. ही पार्श्वभूमी लक्षात घेता सुधारगृहातून सुटकेसाठी त्याने हा आरोप केला, असा संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAY: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! फ्री रेशन योजनेत मोठा बदल; आता 'या' कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो धान्य मिळणार

अजमल कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकर, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळचा काटा आणणारा पहिला लूक प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : विलास घुले खुन प्रकरण माजी खासदार प्रीतम मुंडे कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटीला

घरच्या घरी मेथी, कोथिंबीर, टोमॅटोची शेती... जुही चावलाने घरातच तयार केलं मिनी फार्म

Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT