मुंबई

गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम

CD

‘गोखले’च्या कुलगुरूपदी
डॉ. अजित रानडे कायम
नियुक्ती रद्द केल्याचा निर्णय मागे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती कायम राहणार आहे. त्यांची नियुक्ती रद्द करण्याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला असून तशी माहिती आज गोखले इन्स्टिट्यूट प्रशासनाकडून उच्च न्यायालयात देण्यात आली.
डॉ. रानडे यांची निवड ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार नसल्याचे शोध समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले होते. त्यानंतर, समितीच्या शिफारशीच्या आधारे कुलपती बिबेक देबरॉय यांनी डॉ. रानडे यांची संस्थेच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती रद्द केली. या निर्णयाला रानडे यांनी उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिल मिहिर देसाई यांच्यामार्फत आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने १४ सप्टेंबर रोजी नियुक्त रद्दच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ नये आणि डॉ. रानडे यांना पदावरून तूर्तास हटवण्यात येऊ नये, असे निर्देश दिले होते. मंगळवारी (ता.२२) न्या. रवींद्र घुगे व न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर गोखले विद्यापीठाच्या वकिलांनी माहिती देताना सांगितले, की डॉ. रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने मागे घेतला आहे. त्यामुळे डॉ. रानडे हेच कुलगुरूपदी कायम राहणार आहेत. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल केल्यास डॉ. रानडे यांना न्यायालयात दाद मागता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

डॉ. रानडे यांचा दावा
फेब्रुवारी २०२२ मध्ये गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आणि सप्टेंबर २०२४ मध्ये, आपल्याला यूजीसीच्या नियमांनुसार दहा वर्षांच्या अध्यापनाचा अनुभव नसल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय धक्कादायक व दुर्दैवी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

Pali Flyover Construction Update : 34 ते 35 खांब आणि नवा आराखडा! मुंबई-गोवा हायवेवरील पाली उड्डाणपूल कधी सुरू होणार? समोर आली मोठी अपडेट

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

SCROLL FOR NEXT