मतदानासाठी प्रशासन सज्ज
मतदारांच्या सोयीसाठी केंद्रांवर कलर कोडिंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रस्थानांवरील मतदान केंद्रांवर मतदारांचा गोंधळ होऊ नये, गर्दीचे नियंत्रण व्हावे, यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध रंग संकेतन (कलर कोडिंग) करण्यात येणार आहेत. मतदार चिठ्ठ्यांसह कलर कोडिंग मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा अधिक मतदार असलेली सुमारे ३१ मतदान केंद्र ठिकाणे असून तेथे सुमारे ३६१ मतदान केंद्रे आहेत. यातील काही मतदान केंद्र स्थानांवर एकाच ठिकाणी १८ मतदान केंद्रे असून एका मतदान केंद्रावर सुमारे १,००० ते १,४०० मतदार आहेत. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये, मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, गर्दी टाळावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे कलर कोडिंग मतदान केंद्र तयार केल्याचे यादव यांनी सांगितले.
----
मतदान केंद्रावर विविध सोयी-सुविधा
मुंबई शहर जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रात दिव्यांग, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यता कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. गुगल मॅपनुसार मतदान केंद्राचा नकाशा, मतदान केंद्राचा कलर कोडिंग, मतदान केंद्र असलेल्या विभागाचा रंग, याबाबतची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. तसेच, मतदान केंद्रांवर मतदारांना अनुक्रमांकाचे टोकनही दिले जाणार आहे. ते घेतल्यावर मतदारांना प्रतीक्षा कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रांगेतील क्रमांकानुसार मतदारांना मतदानासाठी संबंधित मतदान केंद्रात सोडले जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.