मुंबई

महारेरा पोर्टलशी संकेतस्थळ लिंक करा

CD

महारेरा पोर्टलशी संकेतस्थळ लिंक करा
घर खरेदीदारांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाचे नियोजन प्राधिकरणाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : कल्याण-डोंबिवलीसह इतर शहरातील वाढत्या बेकायदा बांधकामांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने घर खरेदीदारांच्या सुरक्षेसाठी तसेच पारदर्शकतेसाठी महारेरा पोर्टलशी संकेतस्थळ लिंक करण्याचे निर्देश मंगळवारी राज्याच्या नगरविकास प्राधिकरणांना दिले, तसेच ही प्रक्रिया तीन आठवड्यांत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने दिल्या.

बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सरकार, महारेरा व स्थानिक नियोजन प्राधिकरणांना जबाबदारी निश्चित करून द्यावी, अशी मागणी करत डोंबिवलीतील वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती, या याचिकेवर मंगळवारी (ता. १९) मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने निकाल जाहीर केला. निकालात न्यायालयाने नमूद केले आहे की, रेरा कायद्यांतर्गत रिअल इस्टेट प्रकल्पांच्या नोंदणीसाठी सादर केलेल्या सी.सी. आणि ओसीच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी एकत्रीकरण आवश्यक आहे. या प्रक्रियेमुळे घर घेणाऱ्या ग्राहकांना सुलभतेने व्यवहार करता येतील. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २३ फेब्रुवारी २०२३च्या नागरी विकास विभागाने जारी केलेल्या जीआरचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले, ज्यामध्ये सीसी आणि ओसी जारी करणे, प्रकाशित करणे आणि माहिती पुरवणे याचा समावेश आहे. न्यायालयाने नमूद केले की, जोपर्यंत संपूर्ण एकत्रीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत, सर्व नागरी संस्थांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सीसी आणि ओसी जारी केल्याच्या ४८ तासांच्या आत त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केले जातील; जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल. तसेच, योग्य पडताळणीनंतरच नोंदणी मंजूर करावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले.

..
बेकायदा बांधकामे तीन महिन्यांत पाडा
खंडपीठाने राज्य सरकारला महारेराच्या ऑनलाइन प्रणालीसह बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम (बीपीएमएस)चे एकत्रीकरण तीन महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले, जेणेकरून रिअल इस्टेट प्राधिकरण प्रमाणपत्रांचे क्रॉस-व्हेरिफिकेशन करू शकेल व लोकांची फसवणूक टळेल. त्याचबरोबर याचिका निकाली काढताना न्यायालयाने महारेराला बनावट कागदपत्रे सादर करून बांधलेली परिसरातील बेकायदेशीर बांधकामे तीन महिन्यांत पाडण्याचे निर्देश दिले. तसेच, पोलिसांना रहिवाशांना हटविण्यात प्राधिकरणाला मदत करण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथे मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला आग

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT