सिगारेट नाकारल्याने तलवारीचे वार
मुंबई : सिगारेट दिली नाही म्हणून एका भाजीविक्रेत्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या दोन तरुणांनी तलवारीने वार केले. ही घटना रविवारी (ता. १७) मध्यरात्री चेंबूर कॅम्प परिसरात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाजीविक्रेत्यावर गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदवत सचिन कानोजिया ऊर्फ राहुल (वय १८) आणि अजय बनसोडे (वय २१) या हल्लेखोरांना अटक केली. हे दोघे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत. यापैकी राहुल यास लोकसभा निवडणुकीत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून स्थानबद्ध करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.