मुंबई

चर्चा मतांच्या आघाडीची

CD

चर्चा मतांच्या आघाडीची
कुठे लाखात, तर कुठे हजारात पुढे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय उपाध्याय (बोरिवली), योगेश सागर (चारकोप) आणि मिहीर कोटेचा (मुलुंड) हे तीन उमेदवार तब्बल एक लाख ते ९० हजार मतांची आघाडी घेत विजयी झाले. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत (माहीम), अनंत नर (जोगेश्वरी पूर्व) आणि हारून खान (वर्सोवा) हे उमेदवार किरकोळ आघाडी घेत काठावर निवडून आले.

बोरिवली
हक्काच्या मतदारसंघाने भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांना सर्वाधिक एक लाख आठ मतांची आघाडी मिळवून दिली. उपाध्याय यांना एकूण एक लाख ३९ हजार ३६५ मते पडली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय भोसले यांना ३९ हजार ३५७ मते पडली. २०१९ मध्येही येथून भाजपचे सुनील राणे ९५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते.

चारकोप
विद्यमान आमदार योगेश सागर यांनी ही लढत ९१ हजार १५४ मतांनी जिंकली. त्यांना एक लाख २७ हजार ३५५ मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे यशवंत सिंह यांना ३६ हजार २०१ मते मिळवता आली. २०१९ च्या तुलनेत सागर यांना सुमारे २० हजार मते आणि तितकेच वाढीव मताधिक्य मिळाले.

मुलुंड
भाजपचे विद्यमान आमदार मिहीर कोटेचा २०१९ च्या लढतीत ५८ हजारांची आघाडी मिळाली होती. यंदा त्यांना मुलुंडने ९० हजारांची आघाडी मिळवून दिली. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राकेश शेट्टी यांनी ४० हजार मते घेतली. सुमारे सव्वा लाख मराठी भाषिक असलेल्या या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला असता, तर येथील चित्र बदलू शकले असते, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्‍लेषक देत आहेत.

काठावर पास
माहीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माहीम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी एक हजार ३१६ मतांनी निसटता विजय मिळवला. पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या सावंत यांनी ५० हजार २२३ मते घेतली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि माजी आमदार सदा सरवणकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची ४८ हजार ८९७ मते घेतली, तर अमित ठाकरे ३३ हजार मते घेऊ शकले.

जोगेश्वरी पूर्व
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत नर यांनी एक हजार ५४५ मतांनी खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी आणि शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वायकर यांना हरवले. नर यांना ७७ हजार ४४, तर वायकर यांना ७५ हजार ५०३ मते पडली.

वर्सोवा
शिवसेना ठाकरे गटाच्या हारून खान यांनी एक हजार ६०० मतांनी माजी आमदार भरती लव्हेकर यांचा पराभव केला. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे वर्चस्व आहे. त्यातच ठाकरे गटातून झालेली. बंडखोरी, एमआयएमचे आव्हान असल्याने इथली लढत चुरशीची झाली. खान यांना ६५ हजार ३९६, तर लव्हेकर यांना ६३ हजार ७९६ मते पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT