महिलांची मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाकडे?
भाजपनंतर ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर, २४ मतदारसंघांत महिलांची आघाडी
नितीन जगताप ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील महिला पुरुषांच्या तोडीस तोड काम करतात. नोकरदार महिलांपासून, मनोरंजनापासून ते बिझनेस क्षेत्रातही महिलांचे वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. २४ विधानसभा मतदारसंघांत महिलांचे मतदान जास्त आहे. महिलांचे मतदान जास्त असलेल्या मतदारसंघात भाजपला फायदा झाला. त्यानंतर ठाकरे गट दुसऱ्या, तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईतील सर्व ३६ पैकी २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिला मतदानाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जवळपास दिसून आले आहे. मुंबई शहरात महिलांनी १.४३ टक्के, तर उपनगरात ०.६६ टक्के अधिक मतदान केले आहे. मुंबई शहरात एकूण ५२.६९ टक्के, तर उपनगरात ५६.३९ टक्के मतदान झाले आहे. आजवर महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत फारच कमी दिसून येत होते, परंतु आता हे प्रमाण यंदाच्या निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत त्यांच्या आसपास दिसून आले. प्रत्यक्षात महिला मतदारांची संख्या कमी असली तरी महिला मतदारांच्या संख्येच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी अधिक दिसून आली आहे.
महिलांची टक्केवारी जास्त असलेल्या विधानसभा आणि आमदार
दहिसर - ०.६० टक्के
- मनीषा चौधरी - भाजप
मागाठाणे - १. २६ टक्के
- प्रकाश सुर्वे - शिवसेना
दिंडोशी- १.९ टक्के
- सुनील प्रभू शिवसेना (ठाकरे गट )
कांदिवली प.- ०.३३ टक्के
अतुल भातखळकर - भाजप
चारकोप - ०.२२ टक्के
- योगेश सागर - भाजप
मालाड प. - ०.८८ टक्के
- अस्लम शेख - काँग्रेस
गोरेगाव - ०.८३ टक्के
- विद्या ठाकूर - भाजप
वर्सोवा - ०.५६ टक्के
- हारून खान - ठाकरे गट
अंधेरी प.- ०.२७ टक्के
- अमित साटम - भाजप
अंधेरी पू. - ०.५१ टक्के
- मुरजी पटेल - शिवसेना
विलेपार्ले - ०.१७ टक्के
- पराग अळवणी - भाजप
चांदिवली - २.६६ टक्के
- दिलीप लांडे - शिवसेना
मानखुर्द - २.६१ टक्के
- अबू आझमी - सपा
अणुशक्तीनगर -२.५ टक्के
सना मलिक - राष्ट्रवादी
चेंबूर - ०.०५ टक्के
- तुकाराम काते - शिवसेना
कुर्ला - १.०४ टक्के
- मंगेश कुडाळकर - शिवसेना
कलिना - ०.५४ टक्के
संजय पोतनीस - ठाकरे गट
वांद्रे प. -१.७१ टक्के
- आशीष शेलार - भाजप
धारावी - २.७९ टक्के
ज्योती गायकवाड - काँग्रेस
शीव - १.८८ टक्के
तमिळ सेल्वन - भाजप
वरळी - २.५१ टक्के
- आदित्य ठाकरे - ठाकरे गट
शिवडी - १.३२ टक्के
- अजय चौधरी - ठाकरे गट
भायखळा - ०.४७ टक्के
- मनोज जामसुतकर - ठाकरे गट
कुलाबा - ५.१५ टक्के
- राहुल नार्वेकर - भाजप
पुरुषांची टक्केवारी जास्त असलेल्या विधानसभा
बोरिवली - १.६७ टक्के
- संजय पोतनीस - भाजप
मुलुंड - १.४ टक्के
- मिहीर कोटेचा- भाजप
विक्रोळी - ०.९९ टक्के
- सुनील राऊत - ठाकरे गट
भांडुप प. - ०.०८ टक्के
- अशोक पाटील - शिवसेना
जोगेश्वरी पू. - ०.३४ टक्के
- बाळा नर - ठाकरे गट
घाटकोपर प. - ०.०८ टक्के
- राम कदम - भाजप
घाटकोपर पू. ०.१४ टक्के
- पराग शहा - भाजप
वांद्रे पू. - ०.९३ टक्के
- वरुण सरदेसाई - ठाकरे गट
वडाळा - १.१४ टक्के
- कालिदास कोळंबकर - भाजप
माहीम -१.३१ टक्के
- महेश सावंत - ठाकरे गट
मलबार हिल - ०.३३ टक्के
- मंगलप्रभात लोढा - भाजप
मुंबादेवी - ०.५८ टक्के
- अमीन पटेल - काँग्रेस
पक्षानुसार आमदार आणि मतदारसंघ
पक्ष - भाजप - सेना - ठाकरे गट - काँग्रेस - सपा - राष्ट्रवादी
स्त्री मतदान जास्त - ९ -५ - ६- २-१- १
पुरुष मतदान जास्त - ६- १- ४-१- ० - ०
एकूण आमदार - १५- ६ - १० -३- १- १
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीचाही प्रचारामध्ये महिला केंद्रित मुद्यावर भर होता. राजकारणातील महिलांचा सहभाग वाढला, ही स्वागतार्ह बाब आहे.
उल्का महाजन,
सामाजिक कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.