मुंबई

आता ‘केईएम’मध्ये सीएसटी मॉड्युल थेरपी

CD

आता ‘केईएम’मध्ये सीएसटी मॉड्युल थेरपी

स्मृतिभ्रंश जडलेल्या रुग्णांवर खेळ-संगीताद्वारे उपचार


सकाळ  वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई महापालिका संचालित केईएम रुग्णालयात स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी नवीन उपचार थेरपी सुरू करण्यात आली आहे. रुग्णांची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी लवकरच रुग्णालयाच्या मेमरी क्लिनिकमध्ये कॉग्निटिव्ह स्टिम्युलेशन थेरपी (सीएसटी) सुरू होणार आहे. यात संगीत, खेळ आणि शारीरिक हालचालींद्वारे रुग्णांची स्मरणशक्ती सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे २०२१ मध्ये केईएम रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या उपचारासाठी आधुनिक उपचार थेरपी राबवल्या जात आहेत. या मालिकेत लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजने स्मृतिभ्रंश रुग्णांच्या उपचारासाठी तयार केलेले सीएसटी मॉड्यूल केईएम रुग्णालयात सुरू करण्यात येणार आहे.

न्यूरोसायकॉलॉजी विभागातील मानसशास्त्रज्ञ मयूरी कालिका यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या प्रयत्नांमुळे सीएसटी मॉड्यूल थेरपी सुरू होणार आहे. विभागाच्या युनिटप्रमुख डॉ. उर्वशी शहा यांच्या देखरेखीखाली या मॉड्यूलच्या मदतीने रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

१४ सत्रे होणार
मयूरी यांनी सांगितले की, या मॉड्यूलमध्ये एकूण १४ सत्रे असतील. प्रत्येक सत्रात दोन थेरपिस्ट असतील जे रुग्णांना गटांमध्ये किंवा वैयक्तिकरीत्या खेळ, संगीत आणि शारीरिक क्रियांद्वारे त्यांची विचार करण्याची क्षमता सक्रिय करण्यासाठी सीएसटी ही एक नॉन-फार्माकॉलॉजिकल थेरपी आहे. ती सौम्य ते मध्यम स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांसाठी प्रभावी असून या मॉड्यूलच्या मदतीने स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. येथील डॉक्टरांना स्किझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून या मॉड्यूलचे प्रशिक्षण मिळाले आहे.

मेमरी क्लिनिकचा ३०० रुग्णांना फायदा
तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या क्लिनिकमध्ये ३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सर्वसमावेशक व्यवस्थापनामुळे रुग्णांच्या स्मरणशक्तीला स्थिरता आली आहे. या मेमरी क्लिनिकची ओपीडी दर आठवड्याला सोमवारी असते. ही खोली कोडी, रंगीबेरंगी पुस्तके आणि संज्ञानात्मक व्यायाम प्रदान करणारे तक्ते यांनी भरलेली आहे. येथे न्यूरो-क्लिनिकल असेसमेंट, फिजिओथेरपी आणि रुग्णांचे समुपदेशन करण्यात येते.

महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर
स्मृतिभ्रंश रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात ११ व्या क्रमांकावर आहे, तर जम्मू-काश्मीर हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. स्मृतिभ्रंशाची राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असून महाराष्ट्राची ती ७.८ टक्के एवढी आहे. २०३६पर्यंत महाराष्ट्रात स्मृतिभ्रंश रुग्णांची संख्या १८ लाखांवर जाईल, असा अंदाज न्यूरो तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Rain Nakshatra : यंदा पाऊस कसा पडणार? नक्षत्र अन् वाहनांवरून मिळाले मोठे संकेत; जाणून घ्या पावसाबाबत काय म्हणते शास्त्र

Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

SCROLL FOR NEXT