बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गोवा किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या पाणबुडीसोबत झालेल्या धडकेत बेपत्ता झालेल्या मच्छीमारी बोटीवरील दोन खलाशांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
मर्थोमा नावाची मच्छीमारी बोट २१ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाच्या पाणबुडीला धडकून बुडाली होती. या दुर्घटनेत बोटीवरील १३ खलाशांपैकी ११ जणांना त्याच दिवशी वाचवण्यात आले, तर दोन खलाशी बेपत्ता होते. भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) यांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. गुरुवारी बोटीच्या अवशेषाजवळ समुद्रतळाशी या दोन खलाशांचे मृतदेह सापडले, अशी माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने दिली. दुर्घटनेनंतर एक आठवडाभर चाललेल्या शोधमोहिमेमुळे बुडालेल्या बोटीचे ठिकाण निश्चित करण्यात यश आले. ओएनजीसीच्या मदतीने खलाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते आता संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.