मुंबई

गर्भपातप्रकरणी अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश

CD

गर्भपातप्रकरणी मुलींची ओळख लपवण्यासाठी पॅनेल
उच्च न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गर्भपात प्रकरणात अल्पवयीन मुलींची माहिती लोकांना कळू नये, अल्पवयीन मुलींची ओळख लपवली जावी, यासाठी पॅनेल तयार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले. एमटीपी कायद्यानुसार अशा प्रकरणात अल्पवयीन मुलींची ओळख लपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधारे दोन आठवड्यांत पॅनल तयार केले जाईल, अशी हमी राज्य सरकारने दिली.
डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी, १४ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या १६ वर्षांच्या मुलीवर एमटीपी कायद्याअंतर्गत गर्भपात करण्यासाठी परवानगी मागितली. अल्पवयीन आणि तिच्या आईने प्रक्रियेसाठी याचिकाकर्त्याशी संपर्क साधला होता, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अल्पवयीन व्यक्तीची ओळख उघड करू नये, अशी विनंती केली होती. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की, अल्पवयीन आणि त्यांच्या पालकांच्या विनंतीनुसार, अल्पवयीन मुलीला पोक्सो कायद्याच्या कलम १९(१)अंतर्गत अहवालात अल्पवयीन व्यक्तीची ओळख उघड करण्याची आवश्यकता नाही. याव्यतिरिक्त त्यानंतरच्या कोणत्याही फौजदारी कारवाईमध्ये अल्पवयीन व्यक्तीची ओळख उघड करण्यापासून त्या अल्पवयीन मुलीला सूट आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांनी खंडपीठाला माहिती दिली की, सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची व्यापकपणे प्रसिद्धी करेल. आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व इतर ठिकाणी या निर्णयाची प्रसिद्धी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

SCROLL FOR NEXT