‘आपली चिकित्सा’ पुन्हा बंद
पालिकेचा हलगर्जीपणा, वैद्यकीय सुविधा बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना ‘आपली चिकित्सा’ चाचणी सुविधा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. चाचणी सुविधा देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कृष्णा डायग्नोस्टिकने सध्या ही सेवा देण्यास नकार दिला आहे. या डायग्नोस्टिक्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, करारानुसार आम्हाला मर्यादित संख्येत मूलभूत आणि प्रगत चाचण्या करायच्या होत्या, त्या आम्ही केल्या आहेत. गेल्या सहा ते नऊ महिन्यांपासून या विषयावरील करारामध्ये निश्चित केलेल्या चाचण्यांची संख्या संपणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली होती, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. यावरून पालिकेच्या हलगर्जीपणामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या गरीब रुग्णांना आता बाहेरून तपासणी करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
गरीब रुग्णांना कमी किमतीत चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालिकेने २०१९मध्ये आपला दवाखाना, प्रसूतिगृहे आणि रुग्णालयांमध्ये ‘आपली चिकित्सा’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पूर्वी रुग्णाला ५० रुपये द्यावे लागायचे आणि सुमारे १३७ प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या. यामध्ये अनेक प्रगत चाचण्यांचाही समावेश होता. गेल्या वर्षी पालिकेने रुग्णांसाठी चाचणी सुविधा मोफत करण्याचा निर्णय घेतला, मात्र मंगळवारी (ता.३) ही सेवा पुरविणाऱ्या कृष्णा डायग्नोस्टिकने आपली सेवा बंद केली आहे. याबाबत कृष्णा डायग्नोस्टिकच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन यांनी सांगितले की, आम्ही पालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील आमची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे पालिकेची थकबाकी आहे. त्यांना अनेकदा आठवण करून देऊनही ते आमचे देयक प्रलंबित आहे, यावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. नवीन सेवा पुरवठादाराची निविदेद्वारे निवड होईपर्यंत आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता आम्हाला सेवा देणे कठीण झाले आहे.
११ नोव्हेंबरपासून प्रगत चाचणी बंद
कृष्णा डायग्नोस्टिकच्या म्हणण्यानुसार, पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना ११ नोव्हेंबर २०२४ पासून प्रगत चाचणी थांबवण्याची सूचना केली होती. त्याने फक्त मूलभूत चाचण्या सुरू ठेवण्यास सांगितले, ज्या आम्ही अजूनही करीत आहोत. या निर्णयामुळे रुग्णांचे हाल होत असून, आमच्या कर्मचाऱ्यांनाही रुग्णांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.