मुंबई

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या कोनशिला परिसराची साफसफाई

CD

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या
कोनशिला परिसराची साफसफाई
‘सकाळ’च्या वृत्तानंतर मुंबई विद्यापीठाला जाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः चार वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात भूमिपूजन झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र अद्याप कागदावरच राहिले असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या मुंबई विद्यापीठाने या केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या कोनशिला परिसरातील वाढलेले गवत आणि इतर तण कापून परिसर स्‍वच्छ केला. विद्यापीठाच्या या वेगवान कार्यवाहीवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चार वर्षांपूर्वी तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या कोनशिलेचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर विद्यापीठाने हे केंद्र आणि त्यासाठीची इमारत उभी करण्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या सहा एकर जागेवर कोणतीही कार्यवाही केली नाही. केवळ या केंद्रासाठी आर्थिक निधीची तरतूद केली असल्याचे जाहीर केले. त्यासाठीचा एक रुपयाही खर्च करण्यात आला नसल्याची बाब ‘डॉ. आंबेडकर केंद्र कागदावरच’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ७) वृत्त प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणली. त्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई विद्यापीठ प्रशासनाने या कोनशिलेचा परिसर शोधून त्या ठिकाणची सर्व जागा स्‍वच्छ केली.
विद्यापीठ प्रशासनाने हे आंतरराष्ट्रीय केंद्र उभे करण्यासाठी मागील चार वर्षांपासून अक्षम्य दिरंगाई केली; मात्र त्यावर आपली चूक मान्य न करता विद्यापीठ प्रशासनाकडून या केंद्रासाठी ५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याचे सांगत यासाठी लागणाऱ्या अपेक्षित २५ कोटी रुपयांच्या उभारणीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यात दुसरा प्रस्तावही सादर केला जाणार असल्याचे म्हटले आहे; मात्र या प्रस्तावाचे घोडे नेमके कुठे अडले, याबाबतची माहिती विद्यापीठाने जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. काहींनी विद्यापीठाच्या या भूमिकेवर शंका उपस्थित केल्या आहेत.
ज्या विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी होते त्यांच्याबद्दल इतकी अनास्था योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. तर काही विद्यार्थी आणि बहुजन समाजातील संघटनांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सहा एकर जागेवरील संभ्रम कायम
विद्यापीठातील कलिना संकुलात हे आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्यासाठी सहा एकर जागाही निश्चित केली आहे; मात्र आता या जागेवरच आडकाठी आणली जात असून, हे केंद्र एखाद्या एकरामध्ये आटोपले जाण्याची शक्यता आहे. त्यातही ही जागाच बदली करून संकुलातील एखाद्या आडवळणाच्या जागेवर या केंद्राला जागा दिली जाण्याची शक्यता अधिकारी सूत्रांकडून वर्तवली जात आहे. तर मूळ सहा जागेवर एका मोठ्या संस्थेचा डोळा असल्याने ती जागा रिकामी करून त्या संस्थेच्या घशात टाकण्याची शक्यता असून, यासंदर्भातदेखील विद्यापीठाने आपला खुलासा करावा, अशी मागणीही आता केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: युद्धामुळे अडकलेले कोल्हापूरकर परतले, दुबई प्रशासनाने प्रत्येकाला दिलं २६ हजाराचं गिफ्ट

Latest Marathi News Live Update : पुण्यातील सिंहगड–भोर परिसरात आगीमुळे सुमारे ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाल्याची माहिती वनविभागाने दिली

Gold Price Increase India : सोने -चांदी दरावर युद्धाचा थेट परिणाम, दर वाढीचा फटका

Sanju Samson Video:'तुझं पदार्पण कधी झालंय...', अक्षर पटेलने हा प्रश्न विचारताच कशी होती सॅमसनची रिअॅक्शन?

‘माझ्या मुलाला मायदेशी आणा’, विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवैतमध्ये अडकला, अभिनेत्रीची सरकारकडे मदतीची आर्त हाक

SCROLL FOR NEXT