मुंबई

रखडलेल्या एसआरएतून शिवशाहीला मिळणार उभारी!

CD

रखडलेल्या एसआरएतून शिवशाहीला मिळणार उभारी!
- चार एसआरए प्रकल्प पूर्ण करणार; मंदावलेल्या कारभाराला वेग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी राज्य सरकारने १९९५ मध्ये स्थापन केलेली, पण गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड (एसपीपीएल) या सरकारी उपक्रमाला आता उभारी मिळणार आहे. हाती एकही पुनर्वसन प्रकल्प नसलेल्या शिवशाहीला आता मुंबईतील रखडलेले चार एसआरए प्रकल्प मिळणार आहेत. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची एसआरए प्राधिकरणासोबत बैठक झाली आहे.
रखडलेल्‍या एसआरए प्रकल्पाच्या कामाला वेग येणार असल्याने संबंधित झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, एसपीपीएलच्या कारभाराला गती मिळणार आहे. मुंबईत खासगी विकसकांच्या नाकर्तेपणामुळे सव्वाशेहून अधिक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने रखडलेले एसआरए प्रकल्प खासगी विकसकांकडून काढून घेत म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अशा वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांच्या मदतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी एसआरए प्राधिकरणाकडे काही प्रकल्प मिळावेत, यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात चार प्रकल्प देण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. त्याचबरोबर काही नवीन एसआरए प्रकल्प घेण्याबाबत शिवशाहीचे प्रयत्न सुरू आहेत.

अभ्यास करणार, व्यवहार्यता तपासणार
एसआरए प्राधिकरणाने शिवशाहीला चार पुनर्विकास प्रकल्प देण्याची तयारी दर्शवली असली तरी आम्ही प्रथम या प्रकल्पांचा अभ्यास करू. विकसकाने प्रकल्प अद्याप पूर्ण का केला नाही, कायदेशीर अडचणी आहेत का, याबाबतचा अभ्यास करणार असल्याचे शिवशाहीचे व्यवस्थापकीय संचालक अझीज शेख यांनी सांगितले. तसेच आर्थिकदृष्ट्या प्रकल्प पूर्ण करणे शक्य आहे का, याबाबतची व्यवहार्यता तपासून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निधीचे नो टेन्शन
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे काम गेल्या काही वर्षांपासून मंदावले असले तरी रखडलेले एसआरए पूर्ण करण्यासाठी उपक्रमाकडे स्वतःचा निधी आहे. तसेच पाच हजारांहून अधिक सदनिका संक्रमण शिबिरे म्हणून विकसकांना भाड्याने दिल्या असून, त्यामाध्यमातून उत्पन्न मिळते. त्यामुळे हे एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिवशाहीला निधीचे टेन्शन असणार नाही.

यंत्रणा कामाला लावण्याचा प्रयत्न
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्वतंत्र अशी यंत्रणा आहे. कार्यालय, कर्मचारी आहेत; मात्र हाती प्रकल्प नसल्याने त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होताना दिसत नाही. त्यामुळेच रखडलेले एसआरए प्रकल्प ताब्यात घेऊन काम सुरू केल्यास शिवशाहीची यंत्रणा कामाला लागणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आम्ही रखडलेले एसआरए प्रकल्प शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला मिळावेत, यासाठी एसआरएला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक बैठक झाली आहे. हे प्रकल्प शिवशाहीला मिळाल्यास संबंधित रहिवाशांना लवकर घरे मिळतील, शिवशाहीच्या मंदावलेल्या कारभाराला गती येईल.
- अझीज शेख,
व्यवस्थापकीय संचालक,
शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

SCROLL FOR NEXT