मुंबई

महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदांची भरती

CD

महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदांची भरती
आयटीआय उमेदवारांसाठी संधी; अर्जासाठी २६ डिसेंबरपर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महानिर्मिती या वीज कंपनीत वेगवेगळ्या तंत्रज्ञ पदांच्या ८०० जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे आयटीआयचा आवश्यक ट्रेड केलेल्या बेरोजगार तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. इच्छुकांना महानिर्मितीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आचारसंहिता संपताच महानिर्मितीने नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवारांना www.mahagenco.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. खुल्या गटासाठी ५०० रुपये अधिक जीएसटी, तर राखीव गटासाठी ३०० रुपये अधिक जीएसटी एवढी फी असणार आहे. अर्जासाठी २६ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर संबंधितांना गुणवत्तेनुसार नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरात पाहून अर्ज करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT