मुंबई, ता. ७ : मुंबई सत्र न्यायालयाने हत्या करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा तसेच पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. राजेश बोरीचा असे आरोपीचे नाव आहे. पत्नीला शिवीगाळ करण्यावरून विनोद मोखरा याने त्याचा साडू राजेशला जाब विचारला होता. याच रागातून राजेशने विनोदला बेदम मारहाण करत चाकूने वार केले. या घटनेत विनोदचा मृत्यू झाला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी राजेश बोरीच्या विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याबाबतचा खटला सत्र न्यायालयाचे न्या. एन.जी. शुक्ला यांच्यासमोर झाली. यावेळी आरोपीला दोषी ठरवताना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच पाच हजारांचा दंडही ठोठावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.