मुंबई

पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या जलवाहिन्या बदलणार

CD

पुलाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या जलवाहिन्या बदलणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भांडुप (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळ पूर्व व पश्चिमेला जोडणारा पूल उभारला जाणार आहे. पुलाच्या बांधकामात काही जलवाहिन्या अडथळा ठरत आहेत. यातील काही जलवाहिन्या वळवण्याचा तर काही बदलण्याचा निर्णय जलअभियंता विभागाने घेतला आहे. महानगरपालिका प्रशासन यावर १४ कोटी रुपये खर्च करत आहे.

जलअभियंता विभागाने यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले आहेत. या कामाअंतर्गत पूर्व उपनगरातील परिमंडळ सहामधील एस विभागामध्ये वीर सावरकर मार्गावर भांडुप (पूर्व) रेल्वे स्थानकानजीक पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाचे काम केले जाणार आहे. या कामात ९०० मिमी व ६०० मिमी व्यासाची एकूण ३०० मीटर लांबीची जलवाहिनी येत आहे. या जलवाहिन्या बदलाव्या लागतील तर काही वळवाव्या लागणार आहेत. यासह इतर संलग्न कामेही केली जाणार आहेत. यात वीर सावरकर मार्गावरील एम.डी. केणी मार्ग जंक्शन ते रेल्वे मार्ग क्रॉसिंग समाप्तीपर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, तसेच वळविण्याच्या कामाचा समावेश आहे.

पूर्व उपनगरातील परिमंडळ पाच व परिमंडळ सहामध्ये प्रस्तावित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामामुळे अनपेक्षित येणाऱ्या तत्काळ स्वरूपाच्या मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलणे अथवा वळविणे व इतर कामे करण्याकरिता पालिकेच्या जलअभियंता विभागाने भरीव तरतूदही केली आहे. त्यानुसार पालिकेने ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ई-निविदेला दोन निविदाकारांनी प्रतिसाद दिला.

१४ कोटी रुपये खर्च
मे. हायटेक इंजिनिअर्सचा देकार जास्त वाटल्याने त्यांच्यासोबत वाटाघाटी केल्या. वाटाघाटीअंती मे. हायटेक इंजिनिअर्स यांनी सुधारित दर ०.८८ टक्के सवलत दराने काम करण्यास सहमती दर्शविली आहे. मे. हायटेक इंजिनिअर्स यांनी खोदकाम व तत्सम कामासाठी स्वतःच्या मालकीची अथवा भाड्याने यंत्रसामग्री कामाच्या पहिल्या दिवसापासून उपलब्ध करून देण्याबाबतचे हमीपत्र दिले आहे. यामुळे हे काम त्यांना देण्यात आले आहे. कामाचा कंत्राट कालावधी १५ महिने (पावसाळावगळून) आहे. यावर १४ कोटी ५४ लाख ८८ हजार १२५ रुपये खर्च केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians IPL 2026 Schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर फक्त दोन सामने खेळणार; जाणून घ्या RCB, RR, KKR अन् DC ला केव्हा व कुठे भिडणार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT