बांगलादेशी नागरिकांना एनआयए कोर्टाचा दणका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी (ता. ११) चांगलाच दणका दिला आहे. येथील विशेष एनआयए न्यायालयाने बांगलादेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणे, बनावट कागदपत्रे बाळगणे आणि भारतातील दहशतवादी संघटनांना मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. अनेक बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याचे आढळून आले, तसेच ते बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ‘एबीटी’च्या सदस्यांना मदत करत होते. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब उर्फ राज जेसूब मंडल, हन्नान अन्वर हुसेन खान उर्फ हन्नान बाबुरअली गाझी आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला उर्फ राजा जेसूब मंडल अशी या आरोपींची नावे आहेत. एनआयए कोर्टाने दोषी ठरवलेल्या प्रत्येक आरोपीला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, आणखी काही घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.