मुंबई

प्रवाशांच्या खिशाला कात्री

CD

प्रवाशांच्या खिशाला कात्री
रिक्षाचालकांकडून लूट : शेअरिंगमध्ये वाढवले १० रुपये
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : कुर्ला बुद्ध कॉलनी परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. यानंतर पोलिसांनी मंगळवारी आणि बुधवारी कुर्ला स्थानकाच्या पश्चिमेकडील बेस्ट बससेवा बंद केली. याचा गैरफायदा येथील रिक्षाचालक घेत प्रवाशांची लूट करीत आहेत. कुर्ला पश्चिम बेस्ट आगारातून बीकेसी, कलिना विद्यापीठापर्यंत जाण्यासाठी बेस्ट बससोबत रिक्षाचाही पर्याय आहे. रिक्षाचालक ३० रुपये शेअरिंग भाडे घेतात; परंतु कुर्ला येथे बेस्ट बस अपघातानंतर ही बससेवा बंद केली. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा हा एकमेव पर्याय असल्याने रिक्षाचालकांनी भाडे वाढवले आहे. ३० ऐवजी ४० रुपये आकारण्यात येत आहेत. दर अचानक वाढवल्याने मार्गावरील प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. कुर्ला येथील अपघातानंतर बस मार्गावरील फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम ते कलिना, विद्यापीठ, वांद्रे- कुर्ला संकुल या प्रवासासाठी शेअर रिक्षाचालक नेहमीच्या भाड्यापेक्षा १० रुपये अधिक मागत आहेत.

बेस्ट बसने हा प्रवास केल्यास हा प्रवास पाच ते १० रुपयांत होतो; मात्र यासाठी प्रवाशांना ४० रुपये मोजावे लागत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. बसमार्ग ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ बस कुर्ला आगारातून चालत आहेत. तर, सांताक्रूझ स्थानक ते कुर्ला स्थानकाच्या मार्गावरील ३११, ३१३ आणि ३१८च्या बस टिळकनगर यू वळण घेत कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रूझ स्थानकाकडे जात आहेत. बसमार्ग ३१०च्या बसही टिळकनगर पूल येथे यू वळण घेत बांद्रा बसस्थानकात जात आहेत.

कुर्ला स्थानक पूर्व ते कलिना विद्यापीठ येथे ३० रुपये शेअरिंग आहे; पण रिक्षाचालक ४० रुपयांची मागणी करतात. मीटरने जाण्यास रिक्षाचालक नकार देत अव्वाच्या सव्वा भाडे मागतात.
- कुणाल वाघमारे, प्रवासी

कुर्ला ते फिनिक्स मॉल येथे शेअरिंग ३० रुपये होते; पण स्थानकाबाहेर रिक्षाचालक ४० रुपयांची मागणी करतात. तसेच, इतर मीटर रिक्षाचालकांना तिथे थांबू दिले जात नाही.
- अभिषेक भुरे, प्रवासी

कुर्ला स्थानक ते बीकेसी जाण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून ४० ते ५० रुपये शेअरिंगसाठी वसूल केले जातात. मीटरवर रिक्षा घेऊन जाण्यास चालक नकार देत नाहीत.
- संदीप म्हस्के, प्रवासी

येथे करा तक्रार
आरटीओ - क्रमांक
अंधेरी - ९९२०२४०२०२
वडाळा - ९१५२२४०३०३
बोरिवली - ८५९१९४४७४७
---

मुख्यमंत्र्यांकडे बससेवा सुरू करण्याची मागणी
सोमवारी कुर्ला येथे झालेल्या बस दुर्घटनेनंतर नागरिकांना बससेवेबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दुर्घटनेनंतर मंगळवार आणि बुधवारी कुर्ला स्टेशन येथे बससेवा बंद ठेवली असून सध्या केवळ कुर्ला डेपोपर्यंत बससेवा सुरू आहे. यामुळे प्रवाशांना दररोजच्या प्रवासात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बेस्ट प्रशासनाकडे तत्काळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT