मुंबई

बेस्टच्या अपघातात तीन वर्षांत ६२ मृत्यू

CD

बेस्टच्या अपघातात
तीन वर्षांत ६२ मृत्यू
भाडेतत्त्वावरील बसमुळे ६५ टक्के जीवितहानी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले होते. या अपघाताच्या चौकशीसाठी बेस्टने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांमध्ये बेस्ट बसच्या विविध अपघातांत ६२ जणांचा मृत्यू झाला, तर १७४ जण जखमी झाले. त्यातही भाडेतत्त्वावरील बसमुळे ६५ टक्के मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बेस्ट बसमुळे झालेल्या विविध अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यात कंत्राटी बसमधील अपघात अधिक असून त्यात झालेल्या मृत्यूंची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे बेस्टचा प्रवास, सुरक्षित प्रवास या ब्रीदवाक्याला आता हरताळ फासल्याचेही दिसत आहे. यामुळे बेस्टमधील कंत्राटीकरण संपवून त्याऐवजी बेस्टने स्वतः बसगाड्या चालवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
----
बेस्टचे अपघात
एकूण मृत्यू - ६२
बेस्ट बसमुळे मृत्यू - २२
भाडेतत्त्वावरील बसमुळे मृत्यू - ४०
एकूण जखमी - १७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT